एमपीएससी 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे संभव्य वेळापत्रक जाहीर

mpsc logo

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत सन 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक निश्चित झाले आहेत.

परिक्षेचे नांव, जाहिरातीचा महिना, पूर्व परिक्षेचा दिनांक, मुख्य परिक्षेचा दिनांक अनुक्रमे अशाप्रकारे आहेत.

परिक्षेचे नाव:-

(1) राज्य सेवा परिक्षा-जाहिरात प्रसिध्दीचा महिना डिसेंबर-2019, पूर्व परिक्षेचा दिनांक 5 एप्रिल 20 (रविवार), मुख्यपरिक्षेचे दिनांक 8 ते 10 ऑगस्ट, 2020 (शनिवार,रविवार,सोमवार),

(2)दिवाणी न्यायाधिश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना-जानेवारी 2020, पूर्व परीक्षा ‍दिनांक 5 एप्रिल 2020 (रविवार), मुख्य परिक्षेचा दिनांक- 14 जून 2020 (रविवार),

(3) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परिक्षा-जाहिरात प्रसिध्दीचा महिना, जानेवारी 2020, पूर्व परिक्षेचा दिनांक-15 मार्च, 2020 (रविवार), मुख्य परिक्षेचा दिनांक-12 जुलै-2020

(4) महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा-20-जाहिरात प्रसिध्दीचा महिना-फेब्रुवारी 2020, पूर्व परिक्षा दिनांक 3 मे 2020, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा 20 संयुक्त पेपर क्रमांक-1 मुख्य परिक्षा- 6 सप्टेंबर 20 (रविवार), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक-2, पोलीस उप निरीक्षक मुख्य परिक्षा- दिनांक 13 सप्टेंबर 2020 (रविवार), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक 2 राज्य कर निरीक्षक परिक्षा-27 सप्टेंबर 20 (रविवार), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक-2 सहाय्यक कक्ष अधिकारी परिक्षा- 4 ऑक्टोंबर 2020,

(5) महाराष्ट्र वन सेवा परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना मार्च 2020,पूर्व परिक्षा दिनांक-10 मे 2020, मुख्य परिक्षा दिनांक 11 ऑक्टोबर 2020,

(6)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना-मार्च 2020, पुर्व परिक्षा 17 मे 20 (रविवार), महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षा- परिक्षा दिनांक-18 ऑक्टोंबर20 (रविवार)

(7) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना एप्रिल 20 पूर्व परिक्षा दिनांक 7 जून 20, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परिक्षा 20 संयुक्त पेपर क्रमांक-1 परिक्षा दिनांक 29 नोव्हेंबर 20 (रविवार), महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक2 लिपीक-टंकलेखक मुख्य परिक्षा 6 डिसेंबर 20 (रविवार), महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क गट क परिक्षा दिनांक 13 डिसेंबर 2020 (रविवार),महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परिक्षा- पेपर क्रमांक 2 कर सहाय्यक परिक्षा दिनांक 20 डिसेंबर (रविवार)

(8) महाराष्ट्र कृषि सेवा परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना मे 20, पूर्व परिक्षेचा दिनांक 5 जुलै 20, मुख्य परिक्षा 1 नोव्हेंबर 2020

(9) सहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परिक्षा- जाहिरात प्रसिध्दीचा महिना सप्टेंबर 2020, मुख्य परिक्षा 28 नोव्हेंबर 2020

अशाप्रकारे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे.

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल. या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परिक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परिक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परिक्षा योजना,अभ्यासक्रम,निवड पध्दत इत्यादि तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परिक्षेमधून भरावयाच्या पदसंखेबाबतचा तपशिल जाहिरात/अधिसूचना उपलब्ध करून देण्यात येईल. असे सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content