जामनेर आगाराचा भोंगळ कारभार; शालेय विद्यार्थ्यांचे हाल (व्हिडीओ)

crime news sa

पहूर (रविंद्र लाठे)। शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी पोहचायला रात्री उशिरापर्यंत वेळ लागत असल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथे शिक्षणासाठी शेरी, लोंढरी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी येतात. गेल्या आठ दिवसांपासून या मार्गावरील बसचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे विद्यार्थ्यांना 5 वाजता शाळा सुटल्यावर तब्बल दिड ते दोन तास बसची वाट पहात बसावे लागते आहे. त्यामुळे पालकांचा आपले पाल्य घरी वेळेवर न आल्यामुळे आपला जीव टांगणीला लागत आहे. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांनींना बस येईपर्यंत बसस्थानकावर थांबत असून सदर बस वेळेवर सोडण्याची मागणी शिक्षक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी केली आहे.

दरम्यान जामनेर वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता बस वेळेवर पाठविली होती. परंतु बस नादुरुस्त झाल्याने बस दुरूस्ती करण्यात वेळ लागल्याने बसला पहूर यायला वेळ लागला. यापुढे बस वेळेवर पाठविण्यात येईल असे सांगितले.

Protected Content