दुचाकी अपघातात वयोवृध्द जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद ते नांद्रा रस्त्यावर समोरासमोर झालेल्या दुचाकीच्या धडकेत ६० वर्षीय वृध्द जखमी झाले. याप्रकरणी अज्ञात दुचाकीधारकावर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक भिवा सोनवणे (वय-६०) रा. जिल्हा बँक कॉलनी, खोटे नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी १९ जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ते दुचाकी (एमएच १९ सीएल ८५८६) ने ममुराबाद ते नांद्रा रस्त्याने जात होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने दुचाकीने येत असतांना रस्ता सोडून त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात अशोक सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना जळगावात खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याबाबत मंगळवारी २१ जून रोजी रात्री ११ वाजता अनोळखी दुचाकीधारकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माणिक सपकाळे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!