निर्दयीपणाचा कळस: आठ शाळकरी मुलांची चाकू भोसकून हत्या

4khun1 1

बिजिंग वृत्तसंस्था । चीनमध्ये एका व्यक्तीने निदर्ययीपणे प्राथमिक शाळेच्या 8 मुलांची चाकू मारून हत्या केली आहे. या हल्ल्यावेळी 2 मुले जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ही व्यक्ती नुकतीच तुरुंगातून बाहेर आली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला आहे. हुवेई प्रांताच्या ब्यांगपिंग शहरातील चौयांगपो ग्रेड स्कूलमध्ये ही घटना घडली. या 40 वर्षांच्या निर्दयी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपीने प्रेमिकेचा डोळा फोडल्याच्या गुन्ह्यात गेल्या 8 वर्षांपासून तुरूंगात होती. त्याची नुकतीच सुटका झाली होती. या घटनेमुळे शाळेविरोधात पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सोशल मिडीयावर अनेकांनी शाळांतील सुरक्षा वाढविण्याचे म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून अशा लोकांद्वारे शाळकरी विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. आरोपी अशा हल्ल्यांमकडे अनेकदा समजाचा बदला घेण्याच्या रूपात बघत असल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये चीनच्या हुनान प्रांतातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला झाला होता. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. अशाच प्रकारे बिजिंगमध्ये एका व्यक्तीने हातोडा घेऊन 20 विद्यार्थ्यांना जखमी केले होते. गेल्या वर्षी उत्तर-पश्चिमी शानक्सी भागात एका माध्यमिक शाळेच्या बाहेर हल्लेखोराने नऊ विद्यार्थ्यांची हत्या केली होती. तो या शाळेचा माजी विद्यार्थी होता. त्याने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता.

Protected Content