स्वबळावर लढल्यास भाजपला स्पष्ट बहुमत : गिरीश महाजन

girish mahajan

 

मुंबई (वृत्तसंस्था) आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागांवर विजय मिळेल. अर्थात एकप्रकारे भाजपला स्पष्ट बहुमतातेच भाकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविले आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विशेष म्हणजे जुलै महिन्यात भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातही युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा मिळतील असेच सांगण्यात आले होते.

 

लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपला घवघवीत यश मिळाले. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने विरोधकांचा धुव्वा उडवला. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी चाचपणीही सुरु झाली आहे. त्यामुळे हा वाद ताणला जाऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटण्याची शक्यता आहे. अशातच आता गिरीश महाजन यांनी भाजपला स्वबळावल लढल्यास १६० जागांवर विजय मिळेल, असे म्हटले आहे. मात्र, तरीही महायुतीसोबत निवडणूक लढवण्यास आमचे प्राधान्य असेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दरम्यान,विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदार आवश्यक आहेत. तर ना.महाजन १६० जागांवर विजय सांगताय. याचच अर्थ त्यांना स्पष्ट बहुमत मिळण्याचा विश्वास आहे.

 

भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. पण युती तुटून स्वबळावर लढल्यास भाजपला १६०, शिवसेना ९० तर काँग्रेस-राष्ट्रवादी ३८ जागांपर्यंत थांबेल. तसेच आघाडीत बिघाडी झाल्यास आणि शिवसेना-भाजप मात्र सोबत लढल्यास युतीला २३० जागांवर विजय मिळेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र केवळ 58 जागांवर समाधान मानावे लागेल.

Protected Content