रेशन अपहार प्रकरणी महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवर गुन्हा दाखल

बोदवड प्रतिनिधी । रेशनच्या धान्य वितरणात तीन वर्षांमध्ये तब्बल ७५ लाख ७५ हजार ८१६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक संस्थेतर्फे रेशनचा धान्य पुरवठ्याचे काम करण्यात येते. या संस्थेने धान्य वितरणात घोळ केल्याची फिर्यादा येथील पुरवठा निरीक्षकांनी दिली. यानुसार संबंधीत संस्थेने ४३ लाख ४२ हजार ६१६ रुपयांचा गहू, २७ लाख ८ हजार ४७५ रुपयांचा तांदूळ आणि ५ लाख २४ हजार ७२५ रुपयांची साखर अशा एकूण ७५ लाख ७५ हजार ८१६ रुपये किमतीच्या शासकीय धान्याचा अपहार केला.

याप्रकरणी पुरवठा निरीक्षक रसिक रत्नाकर सातपुते यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्रीय सहकारी ग्रामीण महिला औद्योगिक उत्पादक संस्थेचे चेअरमन व संचालक सदस्यांवर गुन्हा दाखल झाला. शाहिदा परवीन गुलशेर खा पठाण, रेहानाबी नजीर बेग, सयमा परवीन हाफिज, कमल संतोष पाटील, नाशिया बानो हाफिस, गौसिया मतीन, रुहिना जुनेद खान पठाण (सर्व रा.बोदवड) या संशयितांच्या विरूध्द भादंवि कलम ४२०, ४०९, ४७७ अ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मालचे करत आहेत.

Protected Content