यावल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार

यावल, प्रतिनिधी | प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन यावल येथे माजी सैनिकांचा मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड संलग्न ग्रीन प्लॅनेट प्रा लि अंतर्गत यावल किसान प्रोड्युसर कंपनी लि.यावल यांच्या संयुक्त विदयमाने सत्कार करण्यात आला.

कंपनी मार्फत दि.२६ जानेवारी रोजी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्सव प्रजासत्ताक दिनाचा सन्मान या कार्यक्रमाव्दारे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यावल येथील फैजपुर मार्गावरील कंपनीच्या फार्म हाऊस वर आयोजीत या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षा ज्योत्स्ना पाटील व उपाध्यक्ष मुकुंद चौधरी , कंपनीचे सल्लागार दिपक पाटील , व्ही. ई. पाटील , संचालक निलेश पाटील , ए. डी पाटील व ए. टी. चौधरी आदींच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यात माजी सैनिक अय्युब तडवी , दहीगावचे माजी सैनिक राजेश जगताप ,मोहन यहून, सुनिल कदम यावल देविदास नाफडे वड्री , व्ही. ई. पाटील सूर्यभान पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कंपनीने ग्राम उद्योजकाकडून रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, बेडूक उड्या, ग्रामस्वच्छता अभियान आयोजित केले होते. .या स्पर्धांमध्ये प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ग्रामउद्योजक मिलिंद महाजन सर यांनी डी. एच. जैन विद्यालय कोरपावली येथे रांगोळी व निबंध स्पर्धेचे आयोजन केले. त्यात शाळेचे मुख्याध्यापक शावखा तडवी सर, अर्चना राणे ,शरायू राणे आदींचे सहकार्य लाभले. ग्रामउद्योजक विजय साहेबराव पाटील डोंनगाव,राजेंद्र गोविंदा महाजन सातोद,राजेश वामन महाजन न्हावी,गणेश पाटील यावल यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. हर्षल बोरोले सांगवी यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. ग्रामउद्योजक विशाल चौधरी हंबर्डी, अतुल तळेले बोरखेडा यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबविले. ग्रामउद्योजक गोकुळ भागवत पाटील सावखेडा सिम, ज्ञानेश्वर पाटील आडगाव,विजय पाटील डोनगाव , ए. टी. चौधरी वड्री यांनी गावातील माजी सैनिकांचा सत्कार केला. कंपनीकडून मिलिंद महाजन कोरपावली यांना आदर्श ग्रामप्रकल्पधारक पुरस्काराने गौरविण्यात आले. सूत्रसंचालन कंपनीचे संचालक योगेश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजनात कंपनीचे सीइओ हेमंत पाटील, ऑफिस स्टाफ व सर्व फिल्ड ऑफिसर यांचे सहकार्य लाभले.

Protected Content