बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या तरूणाला अटक; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । यावल ते किनगाव रोडवर असलेल्या ‘हॉटेल जलसा’शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या तरूणाला फैजपूर पोलीसांनी अटक केली आहे. ८ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “यावल ते किनगाव रोडवर असलेल्या हॉटेल जलसा शेजारी मोकळ्या जागेत एका झाडाच्या आडोशाला संशयित आरोपी दीपक मधुकर माळी (वय-३७) रा. फुले चौक मुजुमदार नगर, साखळी ता.यावल हा तरुण बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती फैजूपर विभागचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना मिळाली.

गुरूवारी, २७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता सहाय्यक फौजदार प्रमोद चौधरी, अविनाश चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांनी धडक कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून ८ हजार ९०० रुपये किंमतीचा दारुचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दिपक मधुकर माळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल येथील पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content