शिर्डी येथे तेली समाजाचा भव्य मेळावा; उपस्थित राहण्याचे आवाहन

चोपडा लतीश जैन । शिर्डी येथे तेली समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील समाजबांधवांनी याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हाध्यक्ष के.डी. चौधरी यांनी केले आहे.

चोपडा येथे तेली समाजाच्या बैठकीत महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष के. डी. चौधरी यांनी जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, युवक व महिलांना आवर्जून विनंती केली की दिनांक 7 फेब्रुवारी रविवार रोजी सिद्ध संकल्प लॉन्स राहता रोड शिर्डी येथे सकाळी 11 वाजता होणाऱ्या राज्यस्तरीय तेली समाजाच्या विशेष सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे.  

सदरची विशेष सभा म्हणजे तेली समाजाचा एक भव्य मेळावाच आहे .या सभेच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर असणार आहेत. सदरची सभा समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून या सभेत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने विशेष मार्गदर्शन होणार आहे .अनेक मान्यवरांच्या याठिकाणी भेटीगाठी व विचार व्यक्त होणार आहेत .या मेळाव्याने समाजात नवचैतन्य निर्माण होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात संपर्क दौरा करण्यात आला .समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे सांगितले. जळगाव जिल्ह्याची विशेष उपस्थिती राहणार आहे .समाज बांधवांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे नम्र आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज द्वारे करण्यात आले. चोपडा येथे झालेल्या सभेत नारायण चौधरी, संजय चौधरी, नंदू चौधरी ,जे.के. थोरात, प्रशांत चौधरी, अनिल चौधरी, देवकांत चौधरी, चंद्रशेखर चौधरी ,श्री नेरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content