चोपडा रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी सावंत; सचिवपदी याज्ञिक

चोपडा प्रतिनिधी । येथिल रोटरी क्लबशी संलग्नित रोटरॅक्ट क्लब चोपडाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ता दिव्यांक सावंत यांची तर सचिवपदी चेतन याज्ञिक निवड करण्यात आली.

रोटरॅक्ट क्लबचे मावळते अध्यक्ष डॉ.ललित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांची बैठक होवून ही निवड करण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष दिव्यांक अरुण सावंत, उपाध्यक्ष प्रितेश सुभाष पाटील, सचिव चेतन विश्‍वनाथ याज्ञिक व कोषाध्यक्ष सागर श्रीकांत नेवे यांची निवड करण्यात आली. येथील शाखेच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्व गुणांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सतत क्रियाशील राहण्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी यावेळी दिली.समाजातील सर्व थरातून रोटरॅक्ट क्लब च्या युवा टिमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Protected Content