नीट व जेईई मेन परिक्षांच्या तारखा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जेईई मुख्य आणि नीट या दोन्ही प्रवेश परिक्षांना पुढे ढकलण्यात आल्या असून याबाबतची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं जुलै महिन्यात या परीक्षा घेण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मात्र, कोरोनाच्या आपत्तीमुळे परीक्षा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्री पोखरियाल यांनी याची घोषणा केली. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता जेईईची मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबरच्या दरम्यान घेण्यात येईल. तर जेईई अ‍ॅडव्हॉन्स परीक्षा २७ सप्टेंबर आणि नीट परीक्षा ३१ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली.

कोरोनावर अद्यापही नियंत्रण मिळाले नसल्याने यंदा जेईई व नीट या दोन्ही परीक्षाही लांबल्या आहेत. मे महिन्यामध्ये केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी जुलैमध्ये दोन्ही परीक्षा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. तथापि, रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच असल्यामुळे या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Protected Content