रावेरात दोन कोरोना योध्द्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीत साजरा

रावेर शालीक महाजन । कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी अविरतपणे कार्यरत असणार्‍या दोन कोरोना योध्द्यांचा वाढदिवस आज अनोख्या पध्दतीत साजरा करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, फैजपूर उपविभागाचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व रावेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे असे दोन्ही पोलीस अधिकार्‍यांचा वाढदिवस आज होता. सध्या कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत असलेने लोकांमध्ये जनजागृती चे कार्य अहोरात्र करीत असतांना त्यांचा वाढदिवस नाविन्यपूर्ण पध्दतीत साजरा करण्यात आला. याच्या अंतर्गत रावेर कोव्हीड सेंटर येथे क्वॉरंटाईन असलेल्या ९५ रूग्णांना आरोग्य अधिकारी तसेच डॉ एन. डी. महाजन, डॉ रोशन पाटील, डॉ तडवी, सीओ श्री लांडे, नगरसेवक राजेंद्र महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येकाला २५० ग्राम पेंडखजुर ,हलद युक्त दूध,केळी असा अल्पोपहार देण्यात आला.

याप्रसंगी फिजीकल डिस्टन्सींगचे पालन करण्यात आले. तसेच सर्वांनी मास्क घालून अल्पोपहाराचे वाटप केले.

Protected Content