“गीताजयंती” निमित्त पाडळसरेत आजपासून हरिनाम कीर्तन सप्ताह

अमळनेर, प्रतिनिधी | सुर्यकन्या तापीनदी तीरावरील पुनर्वसित अमळनेर तालुक्यातील,पाडळसरे नवीन गावी सालाबादप्रमाणे यावर्षीही “गीताजयंती” निमित्ताने दि. ८ डिसेंबरपासून नागपंचमीच्या दिवशी ग्रामस्थ व संत तुकाराम महाराज भजनी मंडळाच्या सहकार्याने हरिनाम कीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली असून दि. १५ रोजी काल्याच्या किर्तनाने महाप्रसाद वाटप करून हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होणार आहे.

 

बुधवारी नागपंचमी रोजी दुपारी हनुमान मंदिरातच्या सभामंडपात विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिषेक करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती ,दुपारी हरिपाठ व रात्री ८:३० ते १०:३० वाजता जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. यासाठी आळंदी येथील किर्तनकार उपस्थित राहून किर्तनरुपी सेवा देणार आहेत. त्यात दि. ८ रोजी हभप जयेश महाराज (निम),दि. ९ रोजी हभप संजय महाराज (जळगाव ), दि.१० रोजी हभप गोकुळ महाराज (जळगाव ), दि. ११ रोजी हभप भोला महाराज ( जळगाव ), दि. १२ रोजी हभप योगिताबाई शिसोदे ( डांगरी ), दि. १३ रोजी हभप गोपाळ महाराज ( दोनगाव ), दि. १४ रोजी गीता जयंतीनिमित्त दुपारी ४ वाजता गीता ग्रंथासह विठ्ठल रुक्मिणी मूर्त्यांची पालखी सोहळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री हभप प्रा. सुशील महाराज ( विटनेरकर ) यांचे कीर्तन होईल तर दि. १५ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळी हभप सुशील महाराज यांच्या काल्याचा किर्तनाने महाप्रसाद वाटप करून हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता होईल, तरी भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत तुकाराम महाराज भजनी मंडळ व पाडळसरे ग्रामस्थांनी केले आहे.

Protected Content