मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्रात पाट ठेवून दाखवल्यास त्यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आला आहे.
भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात प्रखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या विरोधामुळेच राज यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असं बृजभूषण म्हणाले. उत्तर भारतीयां विरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे.
यावर आता मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी बृजभूषण यांना इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी बृजभूषण सिंह मुंबईत येणार असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र हिंदू असूनही हिंदूंना विरोध करणार्या सुपारीबाज बृजभूषण यांनी शिवरायांच्या पवित्र मातीवर पाऊल ठेवून दाखवावे, त्यांची तंगडी हातात दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा वैभव खेडेकर यांनी दिला आहे.