तनपुरेंची अवस्था अनिल देशमुख यांच्याप्रमाणे होणार : सोमय्या

मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी गैरव्यवहार केले असून यात अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ आता प्राजक्त तनपुरे यांना देखील अटक होईल असा दावा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

काल मंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीने कसून चौकशी केल्यानंतर आज किरीट सोमय्या यांनी याबाबत भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ठाकरे सरकारचे मंत्र्यांचे, नेत्यांचे अनेक घोटाळाचे उद्योग बाहेर येत आहेत. यशवंत जाधव, अजित पवार, अनिल परब आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्या पुढे म्हटाले की, लाखो शेतकर्‍यांचे सहकारी साखर कारखाने एनसीपीच्या नेत्यांच्या नावाने वळवण्यात आले. राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटीची संपत्ती १३ कोटीत दिली गेली तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

Protected Content