भुवनेश्वर दुखापतीमुळे बाहेर ; ‘शार्दुल ठाकूर’ला संधी

bhuneshwar kumar

नवी दिल्ली वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजविरुद्धची भारतीय वन डे मालिका आधीच धोक्यात आली असून भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार जखमी झाला आहे. त्यामुळे आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

येत्या १५ डिसेंबर दोन्ही संघादरम्यानची वनडे मालिका सुरु होत आहे. पहिला सामना खेळण्यासाठी भारतीय संघ चेन्नईत दाखल झाला आहे. पण वनडे मालिकेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुन्हा एकदा जखमी झाला आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी भुवनेश्वरच्या दुखापती संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.  त्याला पुन्हा हर्नियाचा त्रास होत असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आगामी वनडे मालिकेसाठी भुवनेश्ववर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकिपर), शिवम दुबे, केदार जाधव, रविंद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.

Protected Content