पालघर येथे पुन्हा जाणवले ‘भूकंपाचे धक्के’

Earthquake 1548918798

मुंबई वृत्तसंस्था । पालघर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्कांनी हादरले आहे. शुक्रवारी रात्रीपासून पालघरमध्ये भूंकपाचे धक्के बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटे ४.८ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरातील काही गावांना भूकंपाने धक्के बसले.

शनिवारी सकाळी पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे डहाणू तालुक्यातील काही घरांच्या भिंतीला भेगा गेल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे लहान- मोठे धक्के बसत आहेत. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-३ मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी देखील केली होती.

Protected Content