फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती – राऊत

पणजी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर आज पुन्हा टिकास्त्र सोडत फोडा-झोडा आणि राज्य करा ही भाजपची गोव्यातील निती असल्याचा आरोप ेकला आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे. कॉंग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली कॉंग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून शिवसेना इथे वाढतच गेली आहे.

राऊथ पुढे म्हणाले की,कधीकाळी भाजपा देखील सुरूवातीला इथे जेव्हा लढला होता, तेव्हा १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हे राजकारणात निवडणुकांमध्ये हे असं सुरूवातीच्या काळात होत असतं. भाजपाचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचं डिपॉझिट गेलं होतं. मागील लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या बहुसंख्य लोकाचे डिपॉझिट गेले आहे, म्हणून लढायचं नाही का? पण आता गोव्यात शिवसेना रूजते आणि रूजली आहे. एकतर महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, शिवसेनेचं काम करत आहेत आमचे लोक आणि भाजपा विषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. इथे जो गोव्यात भाजपा दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचं इथे सरकार आलं नाही. मनोहर पर्रिकर होते तेव्हा देखील. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपाची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही. असं संजय राऊत एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हणाले आहेत.

शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे. कोणाबरोबरही युती होत नाहीए, होण्याची शक्यता नाही. कारण, कॉंग्रेस आणि भाजपाने आपआपले उमेदवार दिलेले आहेत. नक्कीच कॉंग्रेसने आम्हाला काही जागा देण्याचा प्रयत्न केला. दोन किंवा तीन जागा ते आम्हाला देत होते पण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. त्याच्या विषयी काही निर्णय होत नव्हता, त्यामुळे आम्ही आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे एकत्र येऊन गोव्यात निवडणूक लढवू. साधारण दोन ते तीन दिवसात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल पटेल हे गोव्यात येतील, मी देखील असेल आणि आम्ही आमच्या जागा जाहीर करू. अशी माहिती देखील संजय राऊत यांनी यावेळी दिली.

Protected Content