देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ सुरूच !

मुंबई प्रतिनिधी | देशभरात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे आजच्या आकडेवारीतूनही दिसून आले आहे.

गेल्या २४ तासांत देशात २ लाख ६८ हजार ८३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत १ लाख २२ हजार ६८४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ६,०४१ वर पोहोचली आहे. सध्या देशात कोरोनाचे १४ लाख १७ हजार ८२० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४३ हजार २११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात २३८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.सर्वाधिक १९७ रुग्णांची पुण्यात नोंद झालीय. आतापर्यंत राज्यात १६०५ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालीय.८५९ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्याच चोवीस तासात १० हजार ७६ कोरोना रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील ही गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक वाढ असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या ५० हजारांच्यावर गेले आहेत.

देशात तिसर्या लाटेत ज्या वेगाने दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे, त्यापेक्षा रुग्णसंख्या वाढीचा वेग देशातील मुंबई, दिल्लीसह २० महानगरांतून कितीतरी पटींनी जास्त आहे. या महानगरांत २० टक्क्यांहून अधिक संक्रमण दर आहे. या महानगरांत दर १०० चाचण्यांमागे २० जण कोरोना बाधित आढळत आहेत.

देशात दर लाख लोकसंख्येमागे १९ रुग्ण सध्या कोरोनाबाधित आढळत आहेत. दुसरीकडे दिल्लीतील गुरुग्राममध्ये दर लाख लोकसंख्येमागे १७९ रुग्ण आढळत आहेत. कोलकात्यात दर लाख लोकांमागे १५७, बंगळुरूला १६३, दिल्लीत १३९, तर मुंबईत १३२ जण बाधित आढळत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!