Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

कोरोना : जिल्ह्यात आज एकही बाधित रूग्ण आढळला नाही

0
126


जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळूल आला नाही. तर एक संक्रमित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नसल्याने आता जिल्ह्यात ९ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. दरम्यान जिल्ह्यात एकुण १ लाख ४२ हजार ७७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार १९३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound