शासकीय सुट्टी नसतांना रावेरात अनेक कार्यालय बंद

रावेर प्रतिनिधी । आज वसु- बारस असून शासकीय सुट्टी नाही आहे. मात्र, अनेक कार्यालयात सन्नटा पसरला आहे. तर जळगाव येथून अप-डाऊन करणारे कर्मचारी आज रावेरला सुध्दा आले नाही, यावरुन ग्रामीण भागातुन तक्रारी घेऊन येणाऱ्‍या नागरिकांमध्ये कमालीची नाराजी सुरु उमटत आहे.

दरम्यान, आजपासुन दिवाळीचा पर्व सुरु झाला असून शासकीय सूटी नसतांना अनेक कार्यलाय ओस पडलेले होते.आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असून उद्या व परवा देखिल सूटी नसुन शासकीय कार्यालये सुरु आहे.परंतु रावेर मात्र याला अपवाद आहे.अनेक अधिकारी व कर्मचारी सूटी नसतांना कार्यलायत नव्हते त्यांनी आज दांड्या मारल्या यामुळे ग्रामीण भागातुन तक्रारी घेऊन आलेल्या नागरीकांमध्ये नाराजीचा सुर होता.दांड्या बहाद्दरांकडे  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घालण्याची सर्वसाधारण जनतेतुन होत आहे.

या कार्यालयात होता सन्नाटा

दरम्यान शासकीय सूटी नसतांना वन विभाग, शिक्षण विभागात, तालुका कृषी विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,भूमी अभिलेख विभाग,जलसंधारण विभाग एकात्मक बाल विकास विभाग,पशु वैद्यकीय विभाग, पंचायत समितीत देखिल अनेक विभागात कर्मचारी नव्हते दांड्या मारून गायब होते.

तहसिलदार कार्यालयात 

दरम्यान तहसिलदार उषाराणी देवगुणे सकाळ पासुन कार्यालयात येऊन जनतेच्या समस्या सोडवित होत्या तर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल देखिल कार्यालयात थांबुन जनतेच्या समस्या सोडवितां दिसले तर पोलिस स्टेशनला देखिल कैलास नागरेंची उपस्थिती होती. बाकी कार्यालयात ओस पडलेले होता.

Protected Content