‘पन्नास खोके’ अपुरे पडले, अजून दिलेत पाच खोके ! : खैरेंच्या दाव्याने खळबळ

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यभरात ‘पन्नास खोके’ हा वाक्प्रचार रूढ झालेला असून यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतांनाच खासदार चंद्रकांत खैरे यांनी अजून एक मोठा गौप्यस्फोट केल्याने खळबळ केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडून सत्ता संपादन केल्यानंतर त्यांच्या सोबत गुवाहाटीला गेलेल्या प्रत्येक आमदाराला पन्नास खोके अर्थात पन्नास कोटी मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विशेष करून ठाकरे गटाने हा मुद्दा लाऊन धरला आहे. यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नव्या आरोपाची भर टाकली आहे.

आज चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलतांना म्हणायचे की, या सरकारला शिवाजी महाराजांविषयी काही आस्था नाही. शेतकर्‍यांबद्दल कनवाळा नाही. केवळ आमदार पकडून ठेवायचे. त्यांना खोके द्यायचे एवढंच सुरू आहे. आताही त्यांनी काही आमदारांना पकडून ठेवले आहे. गुवाहाटीला काही खोके दिले काही लोकांना. पाच पाच खोके दिले असं म्हणतात. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपाने नवीन वादाला आमंत्रण दिल्याचे मानले जात आहे.

Protected Content