यावल उबाठाच्या युवा अधिकारीपदी डॉ विवेक अडकमोल

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील शहरातील शिवसेनेचे निष्ठावंत व एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते डॉ विवेक अडकमोल यांची उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा शाखेच्या तालुका युवा अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे .

शिवसेना ( उबाठा ) चे पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या पदधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आल्या असुन,यात यावल येथील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते डॉ विवेक अडकमोल यांची युवा सेने च्या तालुका अधिकारीपदी निवड करण्यात आली आहे .

डॉ विवेक अडकमोल यांच्या निवडीचे यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले तालुका उपप्रमुख शरद कोळी,कडू पाटील ,जिल्हा उप प्रमुख गोपाळ चौधरी ,सुनिल बारी, संतोष खर्चे,पप्पु जोशी,योगेश चौधरी सारंग बेहडे,मयुर खर्चे,अल्पसंख्यांक सेनेचे अजहर खाटिक,सागर देवांग,आर के चौधरी, आदीवासी सेनेचे हुसैन तडवी,विजय पंडीत, जितेन्द्र फालक , विभाग प्रमुख प्रविण लोणारी, शकील पटेल , हारून शेख, इलीयास खान,पिंटू कुंभार यांच्यासह शिवसेना (उबाठा ) च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे .

Protected Content