१७ डिसेंबरला होणार पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे उदघाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे उदघाटन मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीच्या मदतीने रविवार दिनांक १७ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्री उशीरा महत्वाची घोषणा केली आहे. यानुसार, महारेल द्वारे निर्माण केलेल्या पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण दि १७ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे नामपूर येथून होणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व अन्य मान्यवर नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले आहे. दरम्यान, पिंप्राळा उड्डाणपुलाचे कामकाज गतीने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रियेसाठी जळगावचे उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले, तर एमजीएनएफ फेलो दुशांत बांबोळे यांनी समन्वय साधला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी नमूद केले आहे.

Protected Content