दिलासा : ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफलाईन भरता येणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची धामधुम सुरू असतांनाच निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद पडल्याने राज्यभरात हलकल्लोळ उडाल्यामुळे आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देखील दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने राज्यभरात गोंधळ उडाला आहे. वेबसाईट डाऊन झाल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. मात्र, आता निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.

Protected Content