कुऱ्हाड खु येथे रविवारी जिल्हास्तरीय कुस्त्यांची दंगल

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रातिनिधी | तालुक्यातील कुऱ्हाड खु येथे रविवार  ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कुस्त्यांची दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्त्यांचे गादी पुजन ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन तर आखाडा पुजन कुस्तिगीर संघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजीव देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

 

जिल्हास्तरीय कुस्त्यांची दंगल प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून  खा. उन्मेश पाटील, आ. किशोर पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दीक्षित, संघाचे जिल्हा सचिव सुनील देशमुख, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सार्वे जामने येथील सरपंच संजय पाटील जामनेर येथील नगरसेवक सुहास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चौधरी, माजी पंचायत समितीचे सदस्य कैलास चौधरी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पूणे सल्लग्न जळगाव जिल्हा कुस्तीगीर संघ चाळीसगांव राजे संभाजी व्यायाम शाळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे गणप्रमुख जगदीश तेली, अकबर काहकर, सुधाकर महाजन, विकास सोसायटीचे चेअरमन रामदास देशमुख, ग्राम पंचायत सदस्य अरुण बोरसे, माजी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सोनार, माजी सरपंच किरण पाटील, राजू राठोड, भगवान देशमुख, विकास देशमुख, हरी चव्हाण, सुनील शिंदे, महेंद्र बोरसे उपस्थित राहणार आहेत.

 

Protected Content