यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला होणार सादर

sitaraman

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील केंद्रिय अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी २०२० ला सादर होणार असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी जोरात सुरु झाली आहे. अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका कार्यक्रमात दिली आहे.

या अर्थसंकल्पातून सर्वांनाच अपेक्षा आहेत. सरकारसमोर मात्र आर्थिक सुधारणा करताना अर्थव्यवस्था सुरळीत करण्याचे आव्हान असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, अर्थव्यवस्था वेगाने सुधारण्यासाठी सरकारकडून सर्वप्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आयकरात सुधारणा होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. सरकार आयकर कमी करण्याचा विचार करत आहे. त्यातही कार्पोरेट टॅक्स कपात झाल्यानंतर ही मागणी वाढली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२० ला सादर केला जाणार असल्याचे म्हटले होतं. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी हिंदूस्तान लीडरशीप समिटमध्ये सांगितलं होतं की, सरकार अनेक गोष्टींवर विचार करत आहे. आयकरात कपात करण्याचीही शक्यता आहे का? यावर बोलताना ‘अर्थसंकल्प येईपर्यंत थांबा’ असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले होतं. केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये कार्पोरेट टॅक्स कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

Protected Content