बुद्ध उपयोगाचा नाही : संभाजी भिडे

107498323 c1c4f611 19f3 46c8 99ba 48cb07cd54c1

 

सांगली (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपले आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध उपयोगाचा नाही, असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी केले आहे.

आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्यावर संभाजी भिडेंनी आक्षेप घेतला आहे. नरेंद्र मोदी चुकीचे बोलले. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच पाहिजेत, असे संभाजी भिडेंनी म्हटले आहे.

Protected Content