मंदिर बांधून कोरोना जाईल ? शरद पवारांचा केंद्र सरकारला उपोरोधिक प्रश्न

सोलापूर, वृत्तसेवा । कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे. ते आज करोनाच्या संसर्गाच्या वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख केंद्र सरकारकडून निश्चित झाल्यानंतर शरद पवार बोलत होते. कोरोनामुळं जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करतोय. त्याला आम्ही प्रथम प्राधान्य देतोय. काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल, म्हणून त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा, याबाबत मला माहिती नाही, राज्य आणि केंद्र सराकारनं लोकांना कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. देशातील धोकादायक शहरांत सोलापूरचा समावेश होतो. सोलापूरचा मृत्यूदरही चिंता वाढवणारा आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. नियोजत भवनात शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैढक घेण्यात आली.

Protected Content