महत्वाची बातमी : राज्यात शासकीय बदल्यांना स्थगिती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे विविध खात्यांमधील बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असतांना आज राज्य सरकारने शासकीय बदल्यांना स्थगिती देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या बदल्या कोरोनामुळे रखडल्या होत्या. आता विविध विभागांमध्ये बदल्यांचे वारे वाहू लागले असतांनाच राज्य सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. यात नमूद केले आहे की, महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे नियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणार्‍या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्येतेने करावी असे यात म्हटले आहे.

राज्यात वाढलेल्या कोरोना संक्रमाणामुळे, गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही शासकीय बदल्या झालेल्या नाहीत. आता या निर्णयामुळे बदल्यांची प्रक्रिया आणखी एक महिना लांबणीवर पडलेली आहे. बदल्या तूर्तास करु नये, याबाबतची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्याची माहिती आहे. यानुसार आजचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा बदल्या रखडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content