अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वैजापूर येथे अवैध दारू विक्रेत्यावर छापा मारून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, वैजापूर येथील लीलाधर पंडित कोळी (वय ३८) हे गावातील अंगणवाडी मागे कैलास महाराजांच्या घरात अवैद्य दारू विक्री करताना पोलिसांना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून ६ हजार ८७५ रुपयांचे तीन बिअरचे खोके, ५ हजार ५८० रुपयांच्या बॉबी देशी दारूचे दोन खोके, ३१ हजार ६८० रुपयांचे टँगो पंच देशी दारूचे ११ खोके व ३४ हजार ५६० रुपये किमतीच्या देशी दारूचे १२ खोके असा एकूण ७८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे, कॉन्स्टेबल शिवाजी बाविस्कर, संजय इधे, लक्ष्मण सिंगाणे, कुणाल मराठे, प्रमोद पारधी व पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील एपीआय सचिन जाधव, बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, शकील शेख, मनोज दुसाने, प्रमोद मंडलिक यांनी केली आहे.
या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात लीलाधर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: