Home क्राईम बदनामीच्या कारणावरून हाणामारी : दंगलीचा गुन्हा दाखल

बदनामीच्या कारणावरून हाणामारी : दंगलीचा गुन्हा दाखल

0
35
FIR


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकांमध्ये बदनामी करतो या कारणावरून तालुक्यातील मांडवेदिगर येथे झालेल्या हाणामारीच्या प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मांडवेदिगर येथे ७ मे रोजी हाणामारीची घटना झाली होती. यात गोविंद जगन तंवर, रा. डोहरी तांडा, ता. जामनेर हा लोकांमध्ये बदनामी करतो, या कारणावरून तंवर यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली होती. तसेच श्रीराम रामसिंग जाधव यांनी त्यांच्या हातातील बॅटने तंवर यांच्या छातीवर, बरगड्यांवर मारले. यावेळी राहुल रामसिंग जाधव, फुलसिंग मोरसिंग जाधव, शेषमल बद्री जाधव, गोपीचंद नथ्थू पवार, लखीचंद गुलाब पवार व अन्य अनोळखींनी मिळून मारहाण करत छातीवर, पोटावर मारत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रसंगी तंवर यांचा मित्र सागर शिवाजी पवार हा वाद सोडवण्यास गेला असता त्यालाही मारहाण केली. यात पवार हे देखील जखमी झाले होते.

या संदर्भात गोविंदा तंवर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे हे करत आहेत.


Protected Content

Play sound