अडावद येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांना अभिवादन

अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी)। येथे संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२५ वा समाधी सोहळा साजरा करण्यात आला. १०० वर्षांची परंपरा असलेला पालखी सोहळा रद्द करून यावेळी सोशल डिस्टनसिंगचे पालन करून आरती करण्यात आली.

श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त १९ रोजी सकाळी ९ वाजता संत सावता महाराज यांच्या मंदिरात ७२५ वा समाधी सोहळ्या निमित्ताने विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. शंभर वर्षांपासूनचा पालखी सोहळा परंपरा कोरोना विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे खंडीत करण्यात आली. सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत प्रतिमा पूजन व आरती करून संपन्न करण्यात आली. यावेळी हभप चंद्रभान महाजन , लोकनियुक्त सरपंच भावना पंढरीनाथ माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष साखरलाल महाजन, भगवान महाजन, ग्रामपंचायत सदस्य हनुमान महाजन, सचिन महाजन, देविदास महाजन आदींच्या उपस्थित आरती व अभंग गायन करून हा समाधी सोहळा संपन्न झाला.

Protected Content