उड्डाणपुलावर दोन दुचाकींच्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी

धरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी गावातील उड्डाणपुलाजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर दुचाकीवरील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदलाल मिल येथे राहणाऱ्या मरियन अमीन पटेल वय-३३ या महिला आपले पती अमीन पटेल यांच्यासोबत बुधवार १३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुचाकी एमएच १९ एम १६९५ ने जळगाव येथे परत येत असताना धरणगाव तालुक्यातील पाळधी उड्डाणपूलाजवळ समोर येणारे दुचाकी क्रमांक एमएच १९ ई १३२७ ने जोरदार धडक दिली. या अपघातात पटेल दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी मरीन अमीन पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार २१ मार्च रोजी रात्री ११ वाजता अज्ञात दुचाकी धारकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश सोनवणे हे करीत आहे.

Protected Content