दुचाकी चोरीतील संशयिताला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी करून फरार झालेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. सुनील उर्फ लंबू अमरसिंग बारेला वय-२५, रा.गौऱ्यापाडा ता.चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सुनील उर्फ लंबू बारेला हा फरार झाला होता. दरम्यान हा संशयित आरोपी चोपडा शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील सातपुडा हॉटेल समोरून सापळा रचून रचून संशयित आरोपी सुनिल उर्फ लंबू बारेला याला अटक केली. त्याच्या जवळून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content