आदिवासी ग्रामस्थांनी घेतली वृक्ष रक्षणाची शपथ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरदे या गावात वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांच्या प्रमुख उपस्थित यावल वन विभाग आणी वन व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वन दिन साजरा करण्यात आला. यात आदिवासींनी वृक्ष संरक्षणाची शपथ घेतली.

डोंगरदे तालुका यावल येथील दत्त मंदीर परिसरात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आदिवासी वस्तीवर जागतिक वन दिन साजरा करण्यात आला,कार्यक्रमाच्या सुरूवातीस वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे यांच्या प्रमुख उपस्थित वन विभागा व वन व्यवस्थापन समिती वन कर्मचारी यांच्या वतीने सर्व प्रथम डोंगरदे गावात वन वृक्ष संदर्भातआदिवासी बांधवां मध्ये जनजागृती करण्यासाठी गावातुन संवाद यात्रा काढण्यात आली.

या डोंगरदे गावात संपन्न झालेल्या जागतिक वन दिना निमित्ताने आयोजीत ग्राम संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फंटागरे हे होते. यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातुन उपास्थित मान्यवरांनी उपस्थित ग्रामस्यांशी संवाद साधुन वनाचे महत्व विषय केले . याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चेच्या माध्यमातुन संवाद साधुन त्यांना जंगल व वन वृक्ष बाबत चतुःसुत्री कार्यक्रमाची माहिती मार्गदर्शनातुन दिली.

यात वणवा व्यवस्थापन ,बिज संकलन, शाश्वत डिंक संकलन ,पाणवडे जतन, अरण्य ते पृथ्वी स्थोनमस्तु ( अर्थववेद ) म्हजेच वने हेच पृथ्वी वरील खरा दागिना असल्याचे त्यांनी यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी फंटागरे यांनी सांगीतले. या प्रसंगी उपस्थितांनी वन वृक्षांच्या रक्षणांसाठी मी वना मध्ये वणवा पेटविणार नाही , मी डिंक काढण्यासाठी इंजेक्शनचा वापर करणार नाही , मी वनातील वृक्ष तोडणार नाही , मी कोणत्याही वन जिवाला ईजा पहोचविणार नाही व मी वन कर्मचार्‍यांना नेहमीच सहकार्य करेल अशी पंच सुत्री प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.

या कार्यक्रमात वनपाल राजेन्द्र खर्च व कु.वर्षा बडगुजर यांनी देखील उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना पर्यावरण स्नेही जिवन शैलीचे महत्व पटवुन सांगीतले. या कार्यक्रमास डोंगर कठोरा,फैजपुर व मोहमांडली परिमंडळाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास यशस्वी करण्यातसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फंटागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कृष्णा शेळके,बि बि गायकवाड, अतुल तायडे , गोवर्धन डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Protected Content