शिरीष चौधरी समर्थक प्रहार जनशक्ती पक्षात दाखल

जळगाव प्रतिनिधी | अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कट्टर समर्थकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष ना. बच्चू कडू आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

याबाबत वृत्त असे की,ल आज मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या पुढाकाराने अमळनेर येथील माजी नगरसेवक गुलाब पाटील सह प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

या प्रसंगी अमळनेर माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवार अध्यक्ष उपसरपंच रवींद्र पाटील, देवा ग्रुप शहराध्यक्ष दिनेश पाटील, छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख हिरामण पाटील, माजी सरपंच वावडे डॉ.दत्तात्रय ठाकरे, माजी उपसरपंच मुडी प्र डोंगरी अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख जवखेडा भिकन पाटील, गोकुळ कोळी, समाधान पाटील, किशोर पाटील, छत्रपती सेना जळगाव जिल्हाध्यक्ष चिन्मय पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोण खुर्द बापूराव पाटील, प्रवीण पाटील, यांच्या सह प्रमुख नेते पदाधिकारी माजी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवारातील सदस्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

या वेळी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले प्रहार जनशक्ती पक्ष हा कार्यकर्त्यांना बळ देणारा, आधार देणारा, पाठिंबा देणारा पक्ष आहे. अध्यक्ष या नात्याने सर्वांचे स्वागत करतो प्रहार पक्षाचे काम जोमाने आणि ऊर्जा ने करूया ही सदिच्छा.
प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी पुढे म्हणाले जळगांव जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. पक्षात नव्याने आलेल्या सहकार्‍यांच्या मदतीने आता ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू. गरज पडली तर लढाही देऊ. पण गोरगरिबांच्या सेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!