राष्ट्रीय छात्र कॅडेटसने अनोख्या पद्धतीने साजरी केली महात्मा गांधी जयंती

 

फैजपूर, प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सने स्वीडन देशात विकसित प्लॉगिंग ज्यामध्ये हळूहळू धावतांना आजूबाजूचा कचरा वेचून शरीर स्वास्थ्य सोबतच परिसर स्वच्छता करणारी नावीन्यपूर्ण संकल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपापल्या परिसरात यशस्वीपणे राबवली.

धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचे अधिकारी लेफ्टनंट डॉ. राजेंद्र राजपूत यांच्यासोबत 35 कॅडेटसनी प्लॉगिंगमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

प्लॅनिंग म्हणजे हळूहळू धावतांना परिसरातील कचरा वेचणे. यानुसार कडेट्सने कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करीत सोशल डिस्टिंगशनचे पुरेपुर पालन करीत साधारण दोन किलो मीटर रन करून वाटेतील कचरा वेचून परिसर स्वच्छ करून संबंधित व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवले.

सर्वत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध स्वरूपात साजरी होत असतानाच राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून एका अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून या महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. महापुरुषांचे आचार, विचार आणि संस्कार पुढील पिढीमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने समाज उपयोगी व पर्यावरण पूरक उपक्रमांच्या माध्यमातून धनाजी नाना महाविद्यालया कडेट्सनी एक आदर्शवत उदाहरण सर्वांसमोर उभे केले याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content