यावल तालुक्यातील परप्रांतीयांसाठी मोफत बससेवा सज्ज – तहसीलदार

यावल प्रतिनिधी । जिल्ह्यासह राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे परप्रांतीयांना आपापल्या गावाकडे जाण्यासाठी मोफत बसेस उपलब्ध करून दिल्या आहे. त्यापार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील परप्रांतीयांसाठी मोफत बससेवा सज्ज असल्याची माहिती तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी सांगितले.

राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणुमुळे पसरत असलेल्या आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत करण्यात आले. त्यामुळे जळगाव जिल्हयात वेगाने संसर्ग वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर राज्य शासनाकडुन नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन युद्धपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या कालावधीत परराज्यातील मजुरांना, विस्थापित कामगारांना, विद्यार्थ्यांना व इतर नागरीकांना आपआपल्या मुळगावी जाण्यासाठी राज्यशासनाने बसेस मधून नागरीकांना आपल्या मुळगावी मोफत प्रवास करण्याची सुविधा करण्यात आली आहे.

यावल तालुक्याचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली या बाहेरगावी जाणाऱ्या इच्छुकांसाठी प्रवास करणाऱ्या नागरीकांच्या कार्यक्रम अंतर्गत आपआपली नांवे नांव नोंदणी करण्याकरिता यावल बस आगारात जावून पं.स.चे कृषी विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी दिनेश प्रकाश कोते, पं.स.कनिष्ठ सहाय्यक व सहाय्यक नोडल अधिकारी रविन्द्र पाटील यांच्याकडे अटीशर्तींच्या नियमानुसार नांव नोंदणीस सुरूवात करण्यात आले. उद्या ११ मे पासुन सुरु होणाऱ्या एसटी महामंडळाच्या या मोफत प्रवास करण्यासाठी आज ४ वाजेपर्यंत पुण्यासाठी ६, कल्याणकडे जाण्यासाठी ६ आणि बुऱ्‍हाणपुर जाण्याकरीता ७ नागरीक प्रवासांनी आपल्या नांवाची नोंदणी केली असुन, ही प्रक्रीया सुरू राहणार आहे.

सुरूवातीला होणार आरोग्य तपासणी
बाहेरगावी आपआपल्या मुळगावी जाणाऱ्या नागरीकांची आरोग्य तपासणी होणार असून त्यांनतर पुढील मार्गासाठी सोडण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार तथा ईन्सिडेंट कमांडर जितेन्द्र कुवर यानी दिली. आपआपल्या मुळगावी जाण्यासाठी नागरीकांनी या शासनाच्या सवलतीचा लाभ घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान आज सकाळी तहसीलदार यांनी यावल आगारास भेट देवुन आगार व्यवस्थापनाला शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले. यावल आगारातील सर्व एसटी बसेसचे र्निजनतुकीकरण करण्यात येणार असुन यावल आगार प्रवासाच्या आरोग्याची सर्वतोपरीने काळजी घेण्यासाठी कट्टीबद्ध असल्याचे यावल आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस .व्ही . भालेराव यांनी सांगीतले आहे याकामी त्यांना जे .पी .जंजाळ् , वाहतुक नियंत्रक विकास करांडे यांचे सहकार्य मिळत आहे .

Protected Content