चितोडा येथे मेहतर वाल्मिकी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

WhatsApp Image 2019 05 07 at 2.51.46 PM

यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील चितोडा या गावात प्रथमच मेहतर वाल्मिकी समाजाचा शुभ सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

 

यावल तालुक्यातील चितोडा या छोट्याशा गावात सफाईदुत सामाजिक विकास व बहुउद्देशीय संस्था, रावेर जिल्हा जळगाव व्दारे जळगाव जिल्ह्यात प्रथम ऐतिहासीक सामुहिक विवाह सोहळा शेकडो समाज बांधवांच्या साक्षीने पार पडला. यासामुहीक विवाह सोहळयात लखन प्रकाशजी तेजी नंदुरबार व चितोडा ता. यावल येथील उषा किशोर कंडारे, नितिन सुरेश कलोसिया अकोला (विर्दभ) व भुसावळ तालुक्यातील मालेगाव येथील झुंबरलाल तेजी यांची कन्या नंदीनी तेजी, अरूण प्रेमचंद तेजकर फैजपुर ता. यावल व भुसावळ येथील भगवानदास बुद्धप्रकाश बेद यांची कन्या पुजा बेद, तसेच मराठवाडयातील अहमदनगर येथील रोहीत रतनलाल चव्हाण यांचा विवाह चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील शांताराम द्वावारका चावरे यांची कन्या पुजा चावरे, पुणे येथील विक्की अनिल ढंढोरे यांचा विवाह जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील मनोहर मानसिंग चावरे यांची कन्या जान्हवी चावरे, आणि अकोला येथील शुभम रामाजी कलोसे यांचा विवाह भुसावळ येथील सिताराम बाबुजी चावरीया यांची कन्या कविता चावरे यांच्या सोबत विवाह संपन्न झाला. या सामुहिक विवाह सोहळ्यात एकुण सहा वधु वरांचे शुभमंगल पार पडले.

या सामुहिक विवाह सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणुन रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी उपस्थित राहुन वधु वरांना आशिर्वाद दिला. त्यांनी सफाईदुत सामाजिक विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन आयोजीत करण्यात आलेल्या सामुहिक विवाह सोहळ्याचे विशेष कौतुक करत पुढील वर्षी या संस्थेच्या माध्यमातुन यापेक्षा ही मोठे भव्य असे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आयोजकांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली व त्यास आपले सहकार्य राहिल असे सांगुन या विवाह सोहळ्याचे इतरांनी देखील अनुकरण करावे असे सांगीतले, याप्रसंगी समाजातील अनेक सामाजीक कार्यकर्ते राज्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने या विवाह सोहळ्यास उपस्थित होते, संस्थेचे संचालक किशोर रामबगस कंडारे यांच्या वतीने याभव्य अशा सामुहिक विवाह सोहळ्याचे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी त्यांना चितोडा ता. यावल ग्राम पंचायत सरपंच सलीमा सलीम तडवी, उपसरपंच चंदकांत सुरेश जंगले, ग्राम पंचायत सदस्य संजय धांडे, बेबाबाई कडु पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भावना दिनेश धांडे, मनोज निवृती टोंगळे, छाया निवृती टोंगळे, ज्योती महेश पाटील, सुवर्णा मनोज पाटील,चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज संतोष पाटील, आणि ग्रामसेविका रुपाली तळेले यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष वासुदेव बन्सी खराले, उपाध्यक्ष शंकर सोनु दरी, सदस्य कन्हैया दुदाजी आदिवाल, भगवान रामदास धंजे, प्रकाश प्रेमा आदीवाल, किशोर रामबगस कंडारे, प्रल्हाद हरी घारू, देविदास सिताराम बागरे, आणि सुकलाल भंवरलाल धंजे यांनी कामकाज पहिले. यावेळी सुभाष पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Add Comment

Protected Content