शिवसेनेच्या रिक्षाचालक मदत केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना जळगाव महानगरतर्फे रिक्षाचालक बांधवांसाठी पांडे डेअरी चौकात  मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून केंद्राचे उद्घाटन महापौर जयश्री सुनील महाजन व असिस्टंट आटीओ महेश देशमुख यांच्या हस्ते  करण्यात येत आहे. हे मदत केंद्र २५ मेपासून ५ जून पर्यत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.  

 

राज्य शासनाने पंधरा दिवसांसाठी लागू केलेल्या कडक  निर्बंधांमुळे दुर्बल घटकांना रोजीरोटीचा ही प्रश्न  निर्माण झाला आहे. यावर दिलासा देताना रिक्षाचालकांना १५०० रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर हळूहळू जनजीवन सुरळीत होत असल्याने रिक्षा चालकांनाही मदत होत होती. मात्र महिनाभरापासून पुन्हा एकदा बाधितांची संख्या वाढतच चालल्याने रिक्षाचालक अडचणीत सापडले आहेत. शासनाने १५०० रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याने या रिक्षाचालकांना नोंदणी करतांना मदत व्हावी यासाठी पांडे डेअरी चौकात मदत केंद्राचे उद्घाटन महापौर जयश्री सुनील महाजन व असिस्टंट आरटीओ महेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू शिवसेना  शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, शोभा चौधरी,  युवाशक्ती फाउंडेशन संस्थापक विराज कावडीया, उमाकांत जाधव आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/308388310729409

 

Protected Content