बीएचआरमधील संशयितांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असणार्‍या संशयितांच्या जामीनावर आज सुनावणी होणार असून यात नेमके काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीएचआर सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी करून काहींना अटक केली आहे. यातील संशयित सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजीत बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलेले आहेत.

याआधी २२ डिसेंबर रोजी या अर्जांवर सुनावणी होती; परंतु सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी खुलासा सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. त्यामुळे आता ५ जानेवारी रोजी सुनावणी आहे. पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात सुनावणी आहे. यात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content