Home क्राईम लष्कराच्या हद्दीमध्ये बनावट ओळखपत्र दाखवत घुसण्याचा प्रयत्न

लष्कराच्या हद्दीमध्ये बनावट ओळखपत्र दाखवत घुसण्याचा प्रयत्न

0
189


 

 

नगर: वृत्तसंस्था । अहमदनगर येथील लष्कराच्या हद्दीमध्ये लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवत दोन तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

तुषार पाटील व सोपान पाटील (रा.कापूरणी, ता. जि. धुळे) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. न्यायालयात हजर केल्यावर त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. या तरुणांचा लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा नेमका उद्देश काय होता? याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत.

तुषार पाटील व सोपान पाटील हे दोघे नगर येथील लष्कराची हद्द असणाऱ्या बीटीआर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. यावेळी त्यांना गेटवर असलेल्या जवानाने अडवले. या दोघांकडे विचारणा केली असता या दोघांनी लष्कराचे एक ओळखपत्र दाखवले. मात्र या ओळखपत्राबाबत अधिक चौकशी केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. अखेर या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

त्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तुषार पाटील व सोपान पाटील या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला


Protected Content

Play sound