आ. एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मुक्ताईनगर -माजी महसुल कृषी मंत्री विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळ पासूनच आ एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि चाहत्यांची रिघ लागली होती. वाढदिवसा निमित्त आयोजित कार्यक्रमाला कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल भुसारा यांची उपस्थिती होती

कोथळी ते खडसे फार्म हाऊस पर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मोटारसायकल रॅली काढून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले रॅलीत आ एकनाथराव खडसे, आ रोहित पवार, महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आणि मान्यवर ओपन जिप मधुन सहभागी झाले होते. प्रवर्तन चौकात मान्यवरांनी महापुरुषांना अभिवादन केले. यावेळी तीन जे सी बी मधुन पुष्पवृष्टी करुन मान्यवरांचे स्वागत करन्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आ एकनाथराव खडसे यांची लाडूतुला करण्यात आली. त्यानंतर फार्महाऊस येथे आ एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठया पुष्पहाराद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पिंपरी चिंचवड येथील गोल्डमन प्रशांत सपकाळ यांच्या तर्फे नाथाभाऊ यांच्या 71 व्या वाढदिवसा निमित्त 71किलोचा केक कापण्यात आला. जळगाव महापौर जयश्री ताई महाजन यांच्या तर्फे 51हजार किमतीच्या नोटांपासून बनवलेल्या पुष्पगुच्छा देऊन आ. एकनाथराव खडसे यांना शुभेच्छा दिल्या

याप्रसंगी आ रोहित पवार, आ सुनिल भुसारा,महीला आघाडी प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, माजी मंत्री सतिष अण्णा पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या साहेब पाटील , महापौर जयश्री महाजन,माजी आमदार जयदेव गायकवाड, बी एस पाटील, प्रवक्ता सेल राज्याध्यक्ष विकास लवांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष रविकांत वरपे, ओबीसी सेल अध्यक्ष राजा राजपूरकर, प्रसेंनजित पाटील, विनोद तराळ कविता म्हेत्रे, नविद उल जमादार, राम तराळे,पंकज मोहाडे, पंकज बोराडे, राजीव बोचे , उमेश पाटील, रमेश पाटील , रमण भोळे, अनिता येवले, मनीषा पाटील,अशोक लाडवंजारी, सुनिल महाजन, सुधिर तराळ, सचिन पाटील, ज्ञानेश्वर पाटील,ईश्र्वर रहाणे, यु डी पाटील, आबा पाटील, निवृत्ती पाटील, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, राजेंद्र माळी, रामदास पाटील,बी सी महाजन,यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले आ एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आपण विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. एकनाथराव खडसे हे जनसेवेचे वारकरी आहेत मतदारसंघात त्यांनी अनेक विकास कामे केली राहिलेले कामे त्यांच्या माध्यमातुन पुर्ण होतील. रोहिणी ताई खडसे यांच्यावर पवार साहेबांनी राज्याची जबाबदारी दिली आहे त्यांना राज्यभर दौरे करावे लागतील त्यांनी राज्यात दौरे करुन पक्ष संघटन वाढवावे त्यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात पक्ष संघटन आम्ही मजबुत करू अशी ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे म्हणाल्या दरवर्षी आ एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस आपण लोकोपयोगी कार्यक्रम राबवून जल्लोषात साजरा करतो यातून सर्व कार्यकर्त्यांना नविन ऊर्जा मिळते. आज आ रोहित दादा पवार हे वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित राहिले त्यांच्या उपस्थितीने युवकांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला परंतु गेले चार वर्षापासून मतदारसंघाला आपला परीवार मानून प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक गाव खेड्यांपर्यंत पोहचून जनतेच्या समस्या जाणुन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. विविध मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पक्ष संघटन वाढविण्या साठी प्रयत्न केले.

मतदार संघात पक्ष संघटन आणखी मजबुत करण्यासाठी प्रयत्न करत असताना शरद पवार साहेब यांनी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्यामुळे पक्ष संघटन वाढविण्यासाठी राज्यभर दौरे करावे लागतील म्हणुन मतदारसंघाची जबाबदारी, ओझे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणुन तुमच्यावर ठेवते तुम्ही मतदारसंघांतील प्रत्येकाच्या सुख दुःखात सोबत राहाल याचा विश्वास आणि अपेक्षा रोहिणी खडसे यांनी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली. तसेच त्यांनी आपण सर्व शरद पवार साहेब यांच्या सोबत असून तसा विश्वास पवार साहेबाना द्यायचा आहे असे सांगीतले

यावेळी त्यांनी एक स्टिकर प्रकाशित केले सदैव राष्ट्रवादी काँगेस सोबत असा आशय असलेले स्टिकर आगामी काळात मतदारसंघात पदाधिकाऱ्यांनी लावायचे आहे असे सांगीतले. यावेळी आ. रोहित पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाले आ .एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम छोटेखानी आहे असे सांगण्यात आले होते परंतु हा कार्यक्रम एवढा भव्य आहे तरी छोटा म्हंटले जाते मग आ. एकनाथराव खडसे यांचा मोठा कार्यक्रम कसा असेल. आम्ही रॅलीत सहभागी असताना रस्त्यावरील प्रत्येक माणूस आदराने नमस्कार करत होता हि माणसे आ एकनाथराव खडसे, रोहिणी ताई खडसे यांनी जोडलेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान,भावना बघुन 2024 च्या आमदार रोहिणी ताई खडसे होतील याबाबत शंका नाही. सत्ता नसताना पक्ष वाढवणे जिकरीचे असते परंतु एकनाथराव खडसे यांनी याही परिस्थीत राज्यभर पक्ष संघटन वाढवले त्यामुळे 2014मध्ये नाथाभाऊ मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती होती परंतु नविन आलेल्या नेत्यांनी वेगळेच केले काळ बदलला नविन नेते येतात जून्याना विसरतात पण बाप तो बाप असतो मोठा नेता मतदारसंघा बरोबर राज्यातील कामे करतो प्रश्न सोडवतो तेव्हा लोकनेता होतो भाजप ने आपल्या पक्षातील लोकनेते संपवले आता शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस मध्ये फुट पाडली राज्यात पावसाची स्थिती गंभीर आहे सरकारने कापुस कांद्याचा प्रश्न सोडविला नाही. शिंदे गटातील नेते मराठी अस्मितेच्या नावाखाली भाजप सोबत गेले परंतु भाजप नेत्यांनी छत्रपति शिवाजी महाराज आणि महापुरुषांबाबत अपशब्द काढले तेव्हा हे गप्प बसले तेव्हा मराठी अस्मिता कुठे गेली असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला

शिंदे गटाच्या आमदार यांना संरक्षणासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते परंतु गरीब विद्यार्थ्यानकडून तलाठी व इतर भरती साठी हजार रूपये परीक्षा फी घेते यांबाबत प्रश्न विचारला तर बेजबाबदारपणे उत्तर दिले जाते महिला संरक्षणासाठी महविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा संमत केला पण केंद्र सरकार तो लागू करणेसाठी परवानगी देत नाही. राज्यात विवीध प्रश्न आ वासून उभे असताना सरकारला घेणे देणे नाही असे सरकार सत्तेतून खाली खेचण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आ एकनाथराव खडसे म्हणाले गेले चाळीस वर्ष या मतदारसंघातील जनतेने परीवारातील सदस्या प्रमाणे प्रेम दिले सरपंच खरेदी विक्री संघाचा चेअरमन पदाचे काम पाहिले त्यातुन लोकांचा गोतावळा जमा झाला त्यातुन तिस वर्ष लोकांनी आमदार म्हणुन निवडून दिले.

या मतदारसंघात निवडणुकीत खर्च कमी लागला मतदारांनी नेहमीच कामाचा आग्रह धरला ते पुर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला त्यामुळे तिस वर्ष सातत्याने निवडूण आलो 2019 ला तिकीट नाकारण्यात आले. विद्यमान आमदार हे शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंब्याने निवडून आले परंतु त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली उद्धव ठाकरे यांचे कडे गेले त्यांची पण साथ सोडून शिंदे गटात गेले ते चाळीसगाव चे असून आगामी काळात आपल्या पक्षाचा आपल्या मातीतील आमदार निवडून द्या. शरद पवार यांनी तिन आर आ रोहित पवार, रोहिणी ताई खडसे, रोहित पाटील या तीन युवांवर जबाबदारी सोपवली आहे. गेले चार वर्ष रोहिणी ताई खडसे या दिवसरात्र मतदारसंघात काम केले जनतेच्या संपर्कात राहिल्या आता शरद पवार साहेबांनी राज्यभर त्यांना राज्याची जबाबदारी दिली त्यांना तुमचे आशीर्वाद दया. 2019पासुन राज्यात द्वेषाचे राजकारण सूरू आहे विरोधी पक्षातील नेत्या मागे चौकशा लावल्या जातात.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे जालन्यात मराठा आरक्षणा बाबत आंदोलकर्त्यांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन दिले होते निवडणुका आल्या तेव्हा त्याबाबत बैठकी घेण्यात आल्या समित्या नेमण्यात आल्या पण आता दडपशाही करन्यात येत आहे शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे कापुस केळी प्रश्नावर, महागाई वर कोणी बोलत नाही. जनता आगामी काळात भाजप ला नक्कीच धडा शिकवेल. पाच सप्टेंबर रोजी जळगांव येथे शरद पवार साहेबांच्या सभेला उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केलें. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे ,सुत्रसंचलन प्रा .डॉ .सुनिल नेवे, प्रा. डॉ .संजीव साळवे आभार यू डी पाटील यांनी व्यक्त केले.

Protected Content