मुक्ताईनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला एक लाखांची मदत

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी  । तालुक्यातील हरताळा येथील आत्महत्याग्रस्त  शेतकरी ज्ञानेश्वर बानाईत यांच्या  पत्नी मंगला ज्ञानेश्वर बानाईत यांना एक लाखाचा धनादेश देवून मदत करण्यात आली.

आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार संचेता शवेती यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश मंगला ज्ञानेश्वर बानाईत यांना देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, राजू तळेले, प्रफुल्ल पाटील, बाळा पवन सोनवणे, सुदीप बावस्कर, शुभम शर्मा, पंकज राणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.  तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे झालेल्या वादळ तसेच वाऱ्यामुळे भास्कर पाटील यांचे पुत्र महादेव पाटील यांचे पशू धनाचे व घराचे नुकसान झाले याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांना मिळताच घटनास्थळी कोथळी येथे शिवसेनेचे उपसरपंच यांना सोबत घेऊन भेट दिली व तत्काळ तहसीलदार यांना पंचनामासाठी तसेच पुढील मदतीसाठी सूचना केल्या. यावेळी तत्काळ महसूल विभागाकडून पाहणी करून पंचनामा करण्यात आला . नुकसानग्रस्त कुटुंबास शिवसेनेचे उपसरपंच पंकज राणे यांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्या कुटुंबास आर्थिक मदत म्हणून दहा हजार रोख रक्कम त्यांच्या सुपूर्द केली.

Protected Content