बांभोरी प्र.चा.गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बांभोरी प्र.चा.गावात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत होती. यावर अंकुश ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व पोलिसांनी एकत्र येत दारू विक्रेत्यांना समज देत दारू बंदी केली आहे.

 

बांभोरी प्र.चा.गावात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत होती, त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये दारूचे व्यसनाचे प्रमाण कुटुंबातील कमावत्या व्यति व युवकांमध्ये वाढले होते. त्याचे परिणाम अनेक कुटूंब त्यांचे संसार उध्वस्त होत झाले आहे. दिवसभर कष्ट करून महिला जेव्हा घरी यायच्या त्यांना भांडण-तंटे,हिंसाचाराला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक,सामाजिक,मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत होते.. गावठी दारू बंद करण्याच्या उद्देशाने आज बांभोरी प्र.चा.चे सरपंच सचिन बिऱ्हाडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश बुवा, ग्रामसेवक दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी, हिरामण नन्नवरे, जगदीश नन्नवरे, अमोल नन्नवरे,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण नन्नवरे, संतोष नन्नवरे, अनिल नन्नवरे, विशाल पाटील व गावातील युवक लहू सपकाळे, बापू नन्नवरे, जितू नन्नवरे, चंदू नन्नवरे यांनी प्रत्येक दारू विक्रीच्या ठिकाणी जाऊन दारू बंदी करून गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठीचे आवाहन करण्यात आले. दारू विक्री बंद नाही केली तर ग्रामपंचायत गावमध्ये ग्राम रक्षा दल स्थापन करून येणाऱ्या काळात दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कार्य करेल व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने दारू बंदी अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून तडीपार ची कार्यवाही केली जाईल असे सूचित करण्यात आले आहे.

Protected Content