किनगाव येथील विवाहितेचा विनयभंग; यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, “यावल तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्याच भागातील राहणारा संशयित आरोपी अशपाक शहा माजिद शहा याने गुरुवार, दि.२० जानेवारी रोजी, रात्री ९ वाजता महिला घरात एकटी असताना तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.

याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी अशपाक शहा मजीद शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजिज शेख करीत आहे.

Protected Content