टोणगाव शिवारात इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी । तालुक्‍यातील टोणगाव शिवारातील एकाच्या शेतातील विहिरीतून अज्ञाताने इलेक्ट्रिक मोटार चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र धनराज देशमुख (वय-५२) रा. जयहिंद कॉलनी भडगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे टोणगाव शिवारात शेत आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवार २० जानेवारी रोजी ते २१ जानेवारी दरम्यान शेतातील विहिरीतील ८० हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेली आहे. याप्रकरणी शेतकरी राजेंद्र देशमुख यांनी भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.

Protected Content