माता भगिनींचा सत्कार प्रासंगिक मात्र संरक्षणाचे सदैव उत्तरदायित्व सर्व पुरुषवर्गाचे : विजय लुल्हे

 

जळगाव, प्रतिनिधी । माता भगिनींचा सत्कार प्रासंगिक मात्र संरक्षणाचे सदैव उत्तरदायित्व आपल्या सर्व पुरुषवर्गाचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी केले.

जळगाव येथील निवृत्ती नगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये साडी वाटप व सॅनेटराईझ वाटप कार्यक्रम जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे स्वर्गीय पिताश्री . किसन नाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवरात्री पर्वात अष्टमीनिमिताने दि. २४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. त्याप्रसंगी विजय लुल्हे मार्गदर्शन करतांना बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगरसेविका नीता सोनवणे यांच्या हस्ते म न.पाच्या नऊ सफाई कामगार महिलांचा साडी व ब्लाऊज पीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा अंबाबाई पाटील ,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते . विजय लुल्हे यांनी आजी स्वर्गीय शेवंता नथू मिस्तरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांना सॅनीटायझर व मास्क स्वहस्ते सन्मानपूर्पक वितरीत केले.

सत्कारार्थी महिला शोभा बाविस्कर , ज्योती अहिरे , मंगला मोरे , वैशाली अहिरे ,आशा आकाडे ,अनिता अहिरे ,स्वप्ना गाजरे , सुनंदा अहिरे पूर्णिमा बिऱ्हाडे उपस्थित होत्या .पंकज नाले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की , नवरात्री उत्सवातही बलात्काराचे वाढते प्रमाण संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.

अध्यक्षीय भाषणात नगरसेविका निता सोनवणे यांनी रावेर , भुसावळ , धरणगाव , चाळीसगाव येथील महिलांवर बलात्कार करणाऱ्या विकृतांचा निषेध केला . सूत्रसंचालन व आभार जनमत प्रतिष्ठान सचिव हर्षाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक सोनवणे , अनंत नेवे ,सर्पतज्ञ विवेक देसाई ,प्रशांत सुर्वे यांनी सहकार्य लाभले.

Protected Content