अ‍ॅन्टीजेन मोफत तपासणी शिबिराला उत्तम प्रतिसाद

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना जळगाव महानगर व इंडियन रेडक्रॉस सोसायटीची जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ९  मे रोजी  अ‍ॅन्टीजेन मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  शहरातील तुकारामवाडी-गणेशवाडी परिसरातील पडकी विहीर, चिंचेच्या झाडाजवळ सकाळी ८ ते दुपारी २  या वेळेत शिबिर घेण्यात आले.

महापौर सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा , विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसैनिक तथा युवाशक्ती फौंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बर्डे, अनंत जोशी, मनोज चौधरी, गणेश  सोनवणे, जितेंद्र छाजेड, प्रशांत सुरळकर, जयेश ढाके या वेळी उपस्थित होते.

ज्या नागरिकांना ‘कोरोना’ची सौम्य लक्षणे जाणवत होते त्यांनी अँटीजेन टेस्ट करून घेतली. २८४ नागरिकांनी अँटीजेन टेस्ट करून घेतली या पैकी ७ जण कोविड पॉसिटीव्ह आले. शिबिराला डॉ. प्रमोद खिंवसरा यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. शिबिरस्थळी येताना नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन केले, तोंडाला मास्क लावण्यासह सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रीतम शिंदे, संदीप सूर्यवंशी, गोकुळ बारी, उमाकांत जाधव, अर्जुन भारुळे, पियुष हसवाल, राहुल चव्हाण, पियुष तिवारी, दीपक धनजे, अश्फाक शेख, राहुल ठाकरे, गणेश भोई, अरुण गोसावी, यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content